जगातील सर्वाधिक रुग्णवाढ भारतात

Foto
24 तासांत 61,567 कोरोनाबाधित, 933 जणांचा मृत्यू
दिवसेंदिवस जभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे भारतातही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, कोरोनाचा सतत वाढणारा प्रादुर्भाव आता चिंतेचा विषय ठरत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत करोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला. तर शुक्रवारीही भारतात कोरोनाचे 60 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आणि तब्बल 926 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 6 दिवसांमध्ये देशात 3 लाख 28 हजार 903 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये 3 लाख 26 हजार 111 रुग्णांची नोंद झाली. कर ब्राझीलमध्ये 2 लाख 51 हजार 264 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली. तर गुरूवारीच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं 20 लाखांचा टप्पा पार केला.  करोनामुळे सुरूवातीच्या सहा दिवसांमध्ये अमेरिका आणि ब्राझीलमध्ये 6 हजार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे भारतात 5 हजार 075 जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे शुक्रवारी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. बिहार, तेलंगण, ओदिशा, पंजाब आणि मणिपुरमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येंची नोंद झाली. शुक्रवारी महाराष्ट्रात 10 हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या 4 लाख 90 हजार 262 वर पोहोचली. याव्यतिरिक्त राज्यात आतापर्यंत 17 हजारांपेक्षा अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. मुंबईतदेखील शुक्रवारी 1 हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईतील स्थिती सुधारत असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 61 हजार 537 करोनाबाधित रुग्ण आढळतो आहेत. तर गेल्या 24 तासांत 933 जणांचा मृत्यू झाला आहे.देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 88 हजार 612 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात आतापर्यंत 14 लाख 27 हजार 6 रुग्णांवर कोरोनावर मात केली आहे. सहा लाख 19 हजार 98 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 42 हजार 518 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker